म्हणून साऊ आम्हाला आभाळाएवढ्या वाटतात…

म्हणून साऊ आम्हाला आभाळाएवढ्या वाटतात…

आज १० मार्च स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी! आयुष्यातील पन्नास वर्षे समाजकार्यात घालवली, नको नको तो अपमान पचवला. या खडतर प्रवासात येणा-या प्रत्येक अडचणींना पायदळी घालून ध्यासपूर्तीसाठी झटत राहिल्या. कर्मठ समाजाच्या विरोधात जाऊन विवाहबंधनात अडकल्यानंतर ही शिक्षण घेणारी सावित्री आजच्या स्त्रीसाठी आदर्श ठरते. आज आपल्या कर्तृत्वाची गगनभरारी घेणा-या कित्येक सावित्रींच्या पंखांना बळ देणारी सावित्री….