|

भाजप खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मोहनलालगंज मतदारसंघाचे भाजपचे खासदार कौशल किशोर हे गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहेत. कौशल किशोर यांच्या मुलानं-आयुष किशोर यानं स्वत:वर गोळी झाडल्याचा बनाव रचल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर आयुष फरार असल्याचंही सांगण्यात आलं. आयुषला त्याच्याच वडिलांच्या दिल्लीतल्या घरी असल्याचा दावा याआधी अंकितानं मीडियासमोर केला होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पहाटे…