कथ्थक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कथ्थक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कथ्थक सम्राट नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवार-सोमवारच्या मध्यरात्री दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतप्रेमींमध्ये शोककळा पसरली. काल रात्री उशिरा बिरजू महाराज यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने साकेत येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले….