भारत छोडो आंदोलनात अहिंसावादी गांधींनी ‘करो या मरो’ घोषणा दिली होती…

भारत छोडो आंदोलनात अहिंसावादी गांधींनी ‘करो या मरो’ घोषणा दिली होती…

साल होतं १९४२. या काळात इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी हरेक भारतीय नागरिक आतुर झाला होता. त्यामुळे जुलमी इंग्रजांविरुद्ध संबंध देशभरात जागोजागी उठाव होत होते. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन यांनी हिंदी जनतेचे युद्धास सहकार्य मिळविण्यासाठी भरीव राजकीय सुधारणा द्या, अशी मागणी स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांनी इंग्रजांकडं लावून धरली होती. त्यावेळी चर्चिल मंत्रिमंडळानं एक योजना आखली…