‘शाळेविना एकही खेडे असू नये’
|

‘शाळेविना एकही खेडे असू नये’

‘कर्मवीर’ या शब्दाला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे, भाऊराव पाटील. त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटविला, तसंच लोकांच्या मनात स्वाभिमान रुजविला. कर्मवीर अण्णांनी जात-धर्माची चौकट मोडीत काढून स्वाभिमान, पराक्रम, स्वावलंबन, मानवतेची पूजा आणि पुरुषार्थ या पंचसूत्री सद्गुणांच्या आधारावर चांगला समाज घडविण्याचं वृत्त हाती घेत स्वातंत्र्य चळवळीतही मोलाची भूमिका बजावली होती….