नेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव

राष्ट्राचा जो विकास झाला, तो टप्प्याटप्प्याने कसा झाला, हे आपण जाणतोच. त्यात  महाराष्ट्राची नेमकी काय भूमिका होती, त्याचा वारसा चव्हाण साहेबांकडे कसा आला त्यातलं त्यांनी काय घेतलं काय सोडलं त्यातल्या परस्पर गोष्टींचा समन्वय कसा केला हे सुद्धा आपणाला बघितलं पाहिजे. म्हणजेच या सर्व गोष्टींचा संयुक्त महाराष्ट्रा मध्ये किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय वाटा आहे काय योगदान…

“यशवंत” महाराष्ट्र!

“यशवंत” महाराष्ट्र!

संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणून आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. देश-काळ-पात्राचे समग्र भान असणारे, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि राजकारण याचा नेमका समतोल साधू शकणारे, लोकशाही मूल्यांची बूज राखत नवमहाराष्ट्र उभारणीच्या चिरा सर्व भूमिकांच्या विचारांच्या लोकांकरवी घडविणारे, आणि आजच्या साठोत्तरी महाराष्ट्राची वैभव पताका ज्यांनी आपल्या अवघ्या हयातीने तळपवत ठेवली असे…