खासदार नवनीत राणांना सत्र न्यायालयाचा धक्का, जातप्रमाणपत्रासंबंधी वॉरंट कायम
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केललं अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार…