सर करता न येणारा ‘Sir’

सर करता न येणारा ‘Sir’

२०१८ च्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होऊनही टिपिकल मसाला नसल्याने ‘सर’ फारसा चर्चेत आला नाही. मात्र सध्याच्या कोंडल्या स्थितीत नेटफ्लिक्स वर सर ची हजेरी लागली आणि शिळ्या कढीला ऊत म्हणालात तरी हरकत नाही पण या ताक-कण्या अनेकांना मानवल्या.स्त्री- पुरुष नातेसंबंध हा हिंदी चित्रपटांच्या पटकथांचा टीआरपी विषय राहिलेला आहे. आणि अर्थातच त्यामुळे हिरो- हिरोईन यांच्या भोवती…