राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषणसिंह पुणे दौरा करणार,मनसेची गोची.
उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याला तूर्त विरोध न करण्याची भूमिका शहर मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरची वाढती जवळीक, युतीची चर्चा, या पार्श्वभूमीवर तूर्त हा विषय नको, तेव्हाचे तेव्हा…