मेघना पेठे लिखित: हंस अकेला
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात गोष्टी सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या कथावेल्हाळ मराठी माणसाला गदागदा हलवणारी गोष्ट लिहीत मेघना पेठे पुढं आल्या.समाजाची नैतिक चौकट पाळून लिहिणाऱ्या शतकाअखेरीस स्त्री पुरूष नात्यासंदर्भाने,’धर्म-जात-लग्न-संतती’ आदी व्यवस्थांप्रमाणे मेघना जे बोलू पाहत होत्या त्याने ‘मर्यादित अभिरुची’च्या चौकोनी वाचकांना बिथरायला झालं हे खरंच! कारण मेघना थेट लिहीत होत्या,मोडण्याचा आव न आणता तिरपे छेद घेत होत्या,स्त्री…