”महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटण्याचं काम सुरू आहे”- देवेंद्र फडणवीस
|

”महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटण्याचं काम सुरू आहे”- देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव भाषण चांगले देतात. पण कोरोना संकटाच्या नावाखाली महापालिकेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे असे आम्ही आधीपासून सांगत होतो. हे आता प्राप्तिकर विभागाच्या करण्यात येणाऱ्या कारवायांवरून सिद्ध होत आहे. मुंबई महापालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार हळूहळू बाहेर येईल. त्यामुळे यावर मी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील…

नारायण राणेंपाठोपाठ मोहित कंबोज मुंबई महापालिकेच्या रडारवर
|

नारायण राणेंपाठोपाठ मोहित कंबोज मुंबई महापालिकेच्या रडारवर

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला सातत्याने लक्ष्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश या बंगल्याला मुंबई महापालिकेकडून दुसऱ्यांदा नोटीस पाठवल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच आता शिवसेनेवर टीका करणारे भाजपाचे नेते मोहित कंभोज हेही आता मुंबई महापालिकेच्या रडारवर आले आहेत. मोहित कंभोज यांच्या घरात अनधिकृत काम करण्याबाबत मुंबई महापालिकेनं…

नारायण राणेंना BMC ची पुन्हा नोटीस; राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार?
|

नारायण राणेंना BMC ची पुन्हा नोटीस; राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार?

मुंबई – मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राणेंच्या ‘आधिश’ बंगल्यावर खरंच हातोडा पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातं आहे. कारण 15 दिवसांत स्वत: अनधिकृत बांधकाम काढा, अन्यथा कारवाई करावी लागणार, अशी नोटीस बजावण्यात आली…

“जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर..”, नारायण राणेंना मुंबई पालिकेचा इशारा
|

“जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर..”, नारायण राणेंना मुंबई पालिकेचा इशारा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे आता नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, आता या बंगल्यातीमधील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले…

राणेंचा ‘तो’ बंगला वादात; मुंबई महापालिकेने पाठविली नोटिस
|

राणेंचा ‘तो’ बंगला वादात; मुंबई महापालिकेने पाठविली नोटिस

मुंबई – शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामुळे ataराजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या मुंबईमधील जुहू परिसरातील बंगल्यात अनधिकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार होती त्यासंदर्भात तपासणी करण्यासाठी मुंबई मनपाने ही नोटीस नारायण राणेंना बजावली आहे….

मनसेचा एकला चलोरेचा ठाम निर्धार ; राज ठाकरेंनी मागितल्या पदाधिकाऱ्यांना सुचना
|

मनसेचा एकला चलोरेचा ठाम निर्धार ; राज ठाकरेंनी मागितल्या पदाधिकाऱ्यांना सुचना

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी नेते मंडळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसे महापालिका निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतही राज…

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असेलेल्या बीएमसीचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असेलेल्या बीएमसीचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई – महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2022-23 या वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेने यावर्षी 45949.21 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून, गेल्या वर्षीच्या 39038.83कोटींच्या तुलनेत 17.70 टक्के अधिक आहे. या बजेटमध्ये मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना कर माफ करण्यात आला असून 3370 कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करून त्यामध्ये…

मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर?
|

मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर?

मुंबई – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्वात जास्त रुग्ण वाढीचे प्रमाण हे मुंबईमध्ये आहे. मुंबईतील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत कोरोना नियमांचे उल्लंघन करू नका नियम पाळा असे आवाहन केलं आहे. किशोरी पेडणेकर यावेळी बोलताना…

1 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण करणारा मुंबई ठरला देशातील पहिला जिल्हा; वाचा सविस्तर..

1 कोटींहून अधिक लोकांना लसीकरण करणारा मुंबई ठरला देशातील पहिला जिल्हा; वाचा सविस्तर..

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. CoWIN पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत येथे 1 कोटी 63 हजार 497 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. यापैकी 72 लाख 75 हजार 134 असे लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि 27 लाख…

मुंबईत १ ऑगस्ट पासून घरोघरी लसीकरण सुरु होणार !

मुंबईत १ ऑगस्ट पासून घरोघरी लसीकरण सुरु होणार !

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून ७५ वर्षावरील अंथरुणाला खीळलेल्या नागरिकांचे सुद्धा लसीकरण व्हावे यासाठी शासन बीएमसी हे विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयार असल्याच मंगळवारी हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलं. दारोदारी लसीकरण करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच धोरण तयार आहे. त्यात कुठलाही बदल नसून यावरच…

इमारत कोसळली: ‘विनंती करूनही घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल’,झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत
|

इमारत कोसळली: ‘विनंती करूनही घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल’,झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत

मुंबई : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. बातमी समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु झाले. तब्बल १७ जणांची…

‘घरीच रहा, हवामानाचा आनंद घ्या !’ मुंबईकरांना महापालिकेचं आवाहन
|

‘घरीच रहा, हवामानाचा आनंद घ्या !’ मुंबईकरांना महापालिकेचं आवाहन

मुंबई : अखेर तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रीकिनारी भागापासून मार्गक्रमण होत आहे. मुंबईपासून १७० किमी अंतरावरून हे वादळ गुजरातच्या दिशेनं निघाले आहे. त्यामुळे मुंबईत वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई वाऱ्याचा वेग जास्त राहणार असून समुद्रीकिनाऱ्यालगत भागात प्रवास करू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने अरबी समुद्रात बस्तान मांडले…

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर वरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलं !
| |

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर वरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलं !

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केवळ मुंबईचेच मुख्यमंत्री असल्याची भूमिका घेतात’, भाजपचा आरोप पुणे : पुण्यातील लसीकरण केंद्राच्या ऑनलाइन डॅशबोर्डचं अनावरण महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते झालं. त्यावेळी राज्य सरकार पुणे मनपाला ग्लोबल टेंडरसाठी परवानगी देत नसल्याचा आरोप भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी केला होता.आता मुंबई महापालिकेने लशीच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असताना इकडे पुण्यात प्रस्तावित लस…

कुठल्याही कामात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे –  झिशान सिद्दीकी
|

कुठल्याही कामात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे – झिशान सिद्दीकी

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचं आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे चांगलेच संतापले आहेत. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.अनिल परब हे…