|

बाळासाहेब आणि मुलींची शपथ घेवुन सांगतो; मला बदनाम करण्याचा प्रयत्न-अनिल परब

anil parab
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी सचिन वाझे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच आपण कुठल्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे परब यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन्ही मुलीची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. हे सर्व मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे नेते गेल्या दोन दिवसापासून अजून एक मंत्र्याचा राजीनामा घेण्यात येईल असे ओरडत आहेत. म्हणजे त्यांना अगोदर पासून हे प्रकरण त्यांना माहित होते. सचिन वाझे NIA ला पत्र देणारं होते हे भाजपला अगोदरच माहीत होत. एक आरोप माझ्यावर, एक आरोप अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवार यांच्या जवळील घोडावत यांच घेण्यात आल्याचे परब यांनी म्हटले आहे.

            त्याच बरोबर माझ्यावर माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत. त्याचा माझा संबध नाही. अशी चौकशी सुरु आहे मला माहित नाही. महापालिकेच्या कंत्राटदरांशी माजी ओळख सुद्धा नसल्याचे सांगत आपण कुठल्याची चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे परब यांनी सांगितले.

हे आहेत अनिल परब यांच्यावर आरोप

 परब यांनी भेंडी बाजार येथील सैफी बुर्हानी ट्रस्टतर्फे सुरु असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट चौकशी करावी आणि वाटाघाटी करावी आणि माझ्या समोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला शासकीय बंगल्यावर बोलावून सांगितले. असा खळबळजनक आरोप वाझे यांनी केला आहे.      


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *