|

सूर्यकुमारचं तुफानी अर्धशतक,टीम इंडियाचा दणदणीत विजय !

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचा चौथा सामना खेळवला गेला. यात भारताने इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला ८ विकेट्स गमावून १७७ धावाच करता आल्या. इंग्लडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने ४० धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.सहा चौकार आणि तीन षटकरांची बरसात करत सूर्यकुमारने ३१ चेंडूत ५७ धावा ठोकल्या. कारकिर्दीतील पहिलाच चेंडू त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकला आणि त्यावर उत्तुंग षटकार खेचत सूर्यकुमारने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. सूर्यकुमार यादवने झळकावलेल्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने चौथ्या टी २० सामन्यात इंग्लंडला आठ धावांनी धुळ चारली. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच फंलदाची करताना सूर्यकुमारने शानदार खेळी केली. सूर्यकुमारने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.२-२ अशी बरोबरी असल्यामुळे मालिकेच्या दृष्टीने ५ वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा ५ वा सामना २० मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *