Tuesday, October 4, 2022
Homeराजकीयसोनिया-स्मृती वादात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी; राजकारणाचा स्थर खरंच खालावलाय का?

सोनिया-स्मृती वादात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी; राजकारणाचा स्थर खरंच खालावलाय का?

मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील राजकारणाचा स्थर खालवण्याचं चित्र आहे. अनेकदा याच प्रत्तय विविध पद्धतीने पहायला मिळतो. केंद्रीय यंत्रणाचा वापर करून केंद्र सरकार विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील सातत्याने होते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषदा ते खासदार होण्यापर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. मतदार, आमदार ते खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचं दिसून येतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोर आमदारांना करोडींची ऑफर दिल्याचा आरोप देखील झाला होता.

2014 देशातील राजकारण खरोखरंच बदललं की राजकारण बदललं असल्याचा भास होतोय, असा सवाल सर्वांना पडला असेल. केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग आता सुरू झाला की आधीपासून होतोय?, असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातो.

सोनिया गांधी – स्मृती इराणी वाद

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. अधीर रंजन चौधरी यांच्याबद्दल वादग्रस्त केल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून संसदेत चांगलाच वाद पेटला.

कालचा लोकसभेचा दिवस सोनिया गांधी यांच्यामुळे गाजला. सोनिया गांधी सहसा कधी आक्रमक होताना दिसत नाहीत. मात्र, काल सोनिया गांधी काल भडकल्याचं दिसून आलंं. सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना सुनावल्याचं पहायला मिळालं आहे. भाजपने त्यावरून आकांडतांडव करत सोनियांविरुद्ध जोरदार टीका केली.

झालं असं की, अधीर रंजन चौधरी यांनी महिलांचा अपमान केला आहे. तसेच त्यांनी देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्रपतींचा अपमान केलाय. तर आदिवासी समाज देखील दुखावला गेलाय, अशी जोरदार टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. स्मृती इराणी यांचं रौद्ररूप काल लोकसभेत पहायला मिळालं.

लोकसभेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवणाऱ्या तालिका सदस्यांमध्ये रमा देवी यांचाही समावेश होता. “मला यात का ओढले जात आहे, मी काय केले आहे,” असा प्रश्न सोनिया गांधींनी विचारला.

त्यावर तुम्ही ज्यांना काँग्रेसचा गटनेता निवडलं आहे त्यांच्याशी चर्चा करा असा असं सांगितल्याचं रमा देवींनी म्हटलं. तुम्ही असा गटनेता निवडलाय तर त्याबद्दल तुम्हालाचा प्रश्न विचारले जातील, असं रमादेवी म्हणाल्या. रमा देवी यांचं उत्तर सोनिया गांधी यांना उमललं नाही.

रमा देवी आणि सोनिया गांधींमध्ये बातचित सुरू असताना मंत्री स्मृती इराणींनी मध्ये येत सोनिया गांधींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना फटकारलं.

“मी तुमच्याशी बोलत नाही, त्यामुळे मध्ये बोलू नका”, असं वक्तव्य सोनिया गांधींनी केलं. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत वाद शमवण्याचा प्रयत्न केला.

राजकारणातील स्थर खालावलाय का?

राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्याच्या राजकारणावर गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाची वक्तव्य केली होती. त्यावरून सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणावर सर्वच पक्षातील नेते नाराज असल्याचं दिसून येतंय.

नितीन गडकरी-

भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देतात. तर राजकारणाचा स्थर खालावला जातोय, महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती वेगळी आहे. केंद्रीय यंत्रणांचा वावर वाढत चाललाय. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं वक्तव्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्यात केलं होतं.

शरद पवार-

सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आलीये. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रश्न उपस्थित करतात. राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झालंय. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो असं वाटायला लागलंय, असंही गडकरी म्हणतात.

राज ठाकरे-

आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कोण कोणासोबत युती करतंय? कोणाला राजकीय महत्त्वकांक्षा नाही. राजकीय पक्षाला स्वत:च्या मर्दाया असतात. ही लोकं जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचारमंचावर अनेकदा म्हणताना दिसतात.

अशोक चव्हाण-

राज्यातील राजकीय युद्ध गँग वार होऊ नये, राजकारणाचा स्तर घसरलाय, तो राखला जावा तर महाराष्ट्र हिताचे काम होईल, राजकारणात कधी मतभेद असले तरी आमच्या वेळी मनभेद कधीही नव्हते, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणतात.

देवेंद्र फडणवीस-

सध्याची राजकीय परिस्थिती विपरित आहे. आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो, त्यावेळी सर्व पक्षातील आमदारांशी, नेत्यांची मनसोक्त गप्पा होत होत्या. मात्र, आता भेटता येत नाही, भेटीचा वेगळा अर्थ काढला जातो, असं देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते.

राजकारणाचा स्थर खालावण्याचं कारण काय?

काँग्रेस पक्षाला खूप मोठा राजकीय वारसा लाभला आहे. राजकारणाची संस्कृती हा परंपरागत काँग्रेसमध्ये रुजली गेली. मात्र, भाजपचा राष्ट्रवाद हा आक्रमकतेचं प्रतिक राहिला. लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत स्वपक्षीय खासदारांना राजकीय परंपरेचे सल्ले दिले होते. मात्र, सध्याच्या भाजप खासदारांमध्ये राजकीय संस्कृतीचा अभाव दिसून येतो.

काँग्रेसमध्ये वेगळं वातावरण आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल. काँग्रेसमधील अनेक दिगग्ज नेत्यांची कानउघडणी पक्षश्रेष्ठींकडून अनेकदा करण्यात आली आहे. अनेक खासदारांचा राजकीय वारसदार मिळाले, पण वैचारिक वासरदार अनेकांना टिकवता आलेले नाहीत.

ज्यावेळी नितीमत्ता आणि अर्थकारण यात संघर्ष होतो, त्यावेळी अनेकदा अर्थकारणाचा प्रभाव जास्त असतो, असं जेष्ठ तत्वज्ञान जेम्स ग्राॅन्ड म्हणतो. हेच सध्या राजकारणात होताना पहायला मिळतं. राजकारणापेक्षा अर्थकारण आणि सत्ताकारणावर अधिक भर असल्याचं दिसून येतो.

मतभेद आणि मनभेद यात फरक पहायला मिळत नाही, त्याचं कारण अनेक वर्ष सत्तेबाहेर राहिलेली भाजप. सत्तेची महत्त्वकांक्षा आणि व्यापक स्थैर्याचं राजकारण याच पिसून जाते ती देशाची भोळीभाबडी जनता…

हे ही वाचा की-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments