अनिल देशमुख यांना सर्वोच्य न्यायालयाचा दणका; १०० कोटी प्रकरण भोवणार

दिल्ली: परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात अनिल देशमुख हे सर्वोच्य न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना दणका देत सीबीआय चौकशी योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
याप्रकरणात आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही. त्यामुळे सीबीआय कडून होऊ घातलेली चौकशी रोखावी, अशी मागणी करणारा अर्ज अनिल देशमुख यांनी सर्वोच्य न्यायालयात दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात सीबीआय चौकशी योग्य असल्याचे सर्वोच्य न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालायचा निर्णय उचलून धरला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला समोर जावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्या नंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी दिल्लीत जावून अभिषेख मनू शिंघवी यांची भेट घेत सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्य न्यायालयाने ही मते नोंदविली
- हे प्रकरण गंभीर आहे
- आयुक्तां पासून ते गृहमंत्र्याबाबत गंभीर आरोप
- स्वतंत्र चौकशी होण्याची गरज
काय आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सीन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देसमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते अस आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला