या ४२ वर्षीय अभिनेत्रीला नवरा सुचवा!

नवी दिल्ली : ४२ वर्षीय अभिनेत्री शमिता शेट्टी आता नवर्याच्या शोधात आहे. सोशल मिडीयावर नेहमी अॅक्टिव राहणाऱ्या शामिताने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिची विवाहबद्ध होण्याची इच्छा बोलून दाखवली.
‘मला विवाहबद्ध व्हायचे आहे पण माझा नवरा कुठे आहे, मला माहित नाही. मला त्याला शोधावं लागणार आहे. माझ्या मनातल्या गोष्टी मी कधीही लपवत नाही. त्यामुळे मी अनेकदा अडचणीत देखील येते. पण माझा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. बाहेर समाजात आणि लोकांच्या वैवाहिक आयुष्यात जे चालले आहे ते भयानक आहे. जर मी कोणाशी लग्न केले तर मला आयुष्याभरासाठीचं नातं हवं आहे. असं होईल याची काही शाश्वती नाही. पण अशी व्यक्ती मला अजून भेटलेली नाहीये’, असं शमिता म्हणाली.
शमिता नुकत्याच रिलीज झालेल्या ‘ब्लॅक विडोज’ या वेब सेरीजमध्ये झळकली होती.
घरातील मंगल कार्य उरकण्याचा उन्हाळी मुहूर्त जवळ येत आहे. जर तुमच्या नजरेत शमितासाठी एखादा साजेसा वर असेल तर नक्की सुचवा!