Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचापॅसेंजर ट्रेनला अचानक आग ,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

पॅसेंजर ट्रेनला अचानक आग ,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

रोहतक: देशभरात उष्णता वाढत असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान आता रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका पॅसेंजर ट्रेनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील रोहतक रेल्वे स्थानकात दिल्लीहून येणाऱ्या मेमू ट्रेनच्या तीन डब्यांना अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही वेळातच ट्रेनचे तिन्ही डबे जळून खाक झाले आहेत. उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेमू गाडी संध्याकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास रोहतकहून दिल्लीकडे रवाना होणार होती. परंतु दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती मिलाली. ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरूवात केली.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या माहितीनुसार, मध्य रेल्वे अंतर्गत मेमू ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाली आणि त्यानंतर २.२० मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक एकला लागून असलेल्या गुड्स लाईनमध्ये उभ्या असलेल्या या ट्रेनला अचानक आग लागली. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. चांगली बाब म्हणजे ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी ट्रेनमध्ये कुणीही प्रवासी उपस्थित नव्हता. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments