..असा होता प्रसिद्ध उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा प्रवास

स्वातंत्र्यपूर्व भारतातले प्रसिद्ध लेखक आणि ‘तोबा तेक सिंग’, ‘तमाशा’, ‘काली सलवार’, ‘मंटो के अफसाने’ यांसारख्या लघुकथांचे कथाकार सादत हसन मंटो उर्फ ‘मंटो’ यांची आज ६८वी पुण्यतिथी आहे. मंटो प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक आणि नाटककार होते. मंटोंचा जन्म ११ मे १९१२ मध्ये समरला,पंजाब (भारतावर ब्रिटिश शासित काळ) मध्ये झाला होता.
मंटो उर्दू साहित्यातले ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते. उर्दू साहित्यामध्ये मंटोंचे लेखन अजूनही लोक वाचतात विशेषतः तरुणाईचा त्यांच्या लेखनाकडे विशेष कल असतो. याच लेखनाने मंटोंना अडचणीत आणले होते. मंटोंवर त्यांच्या लेखन अश्लीलतेसाठी एकूण ६ वेळेस खटला चालविण्यात आला होता, ३ खटले स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये (१९४७ च्या पूर्वी) आणि ३ खटले फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये चालवण्यात आले. या खटल्यांमध्ये मंटों कधीच दोषी ठरले नाहीत.
मंटो त्यांच्या काळानुसार प्रगतशील लेखक होते, स्पष्टवक्ते लेखक अशी त्यांची ओळख होती. थेटपणे सारेकाही मांडायच्या पद्धतीने मंटोंना प्रसिद्ध केले. मंटोंची लेखनाची शैली अनोखी, थट्टा करणारी आणि बेधडक बोलणारी होती. जनसामान्यांच्या संतापाचे आणि निराशेचे त्यांनी ज्या पद्धतीने वर्णन केले, ते उर्दू साहित्याच्या इतिहासात उल्लेखनीय आहे.
मंटोंच “थंडा घोष” या लघुकथानंतर मंटोंना तुरुंगात टाकण्यात आले, या लघुकथेची निंदा झाली. फैज अहमद फैजने या कथेला अनैतिक असे घोषित केले होते. मंटोंचे मुस्लिम स्त्रियां बाबात असलेले प्रगतशील विचारांची टीका झाली होती. अनैतिकतेच्या टिप्पणीवर मंटोने “तुम्ही माझ्या कामावर भाष्य करू शकता आणि त्यावर टीका करू शकता, मला काही हरकत नाही, परंतु त्याला ‘साहित्यिक मजकूर म्हणून लेबल करण्याइतपत योग्य नाही’ असे म्हणणे, याला मी ठामपणे असहमत आहे” (‘मंटो’ चित्रपट, २०१८) असे मंटो यांनी उत्तर दिले होते.
मंटों फाळणीच्या विरुद्ध होते, मंटोंच्या लेखनात हे स्पष्टपणे जाणवते. माणुसकीच्या नात्याला धरून बेधडक लिखाण करणारे मंटोंचीही गुणवत्ता त्यांना लोकप्रिय बनवण्यात उपयुक्त ठरली. मंटोंच्या लेखनातील स्त्रियांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, काही आक्रमक होत्या, काही वेड्या होत्या आणि काही “मृत पण जिवंत” होत्या. त्यांच्या कथांमधील अश्लीलता अगदी स्पष्ट आहे, ज्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली होती, परंतु त्यांनी नेहमीच सत्य सांगून स्वतःचा बचाव केला.
“जर तुम्हाला माझ्या कथा घाणेरड्या वाटत असतील तर तुम्ही ज्या समाजात राहत आहात तो समाज गलिच्छ आहे’ असे सांगत त्यांनी आपला बचाव केला. मंटोंना फाळणीच्या दुष्परिणाम त्यांच्या लेखनात वर्णन करणे सोपे होते कारण ते स्वतः त्या घटनेचे बळी होते. मंटोंने दिल्ली,बॉमबे (मुंबई) मध्ये काम करून पाकिस्तानला पत्नी आणि मुलींसोबत स्थायिक होण्याचे निर्णय घेतले.
मंटोंने लेखक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात विक्टर ह्यूगो, ऑस्कर वाइल्ड, रशियन लेखक चेखोव आणि गॉर्कीच्या अश्या दिग्गज लेखकांच्या लेखांचे भाषांतर करण्यापासून केली. त्यांची पहिली कथा ‘तमाशा’ ही जालियनवाला बाग घटनेवर आधारित होती. मंटोच्या कामाला बऱ्याच काळानंतर हवा तसा प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा मंटोंकडे बघण्याचा दृष्टिकोण दानिश इक्बालचे नाटक एक ‘कुत्ते कि कहानी’ ने बदलून टाकला होते.
२००५ मध्ये मंटोंच्या ५०व्या पुण्यतिथीवर पाकिस्तानी सरकारने त्यांना ‘निशाण-ए-इम्तियाज’ या सन्मानाने सन्मानित केले. तसेच २०१५ मध्ये पाकिस्तानी अभिनेता आणि दिग्दर्शक सर्मद खुसतने मंटोंवर चित्रपट प्रदर्शित केला. २०१८ मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनने (bbc) ‘१०० जगाला नवीन दृष्टिकोन देणाऱ्या कथां’ मध्ये मंटोंच्या “तोबा टेक सिंग” या कथेला समाविष्ट केले होते. पाकिस्तानी चित्रपटाकडून प्रेरित होऊन बॉलीवूडने त्यांच्या हिंदी सिनेमा मधील कार्याला सन्मानित करत मंटो नावाचाच हिंदी सिनेमा २०१८ ला प्रदर्शित केला. नवाझुद्दीन सिद्दीकीने मंटो या चित्रपटात मंटोंची भूमिका साकारली होती.
मंटोंच्या लेखणीने बऱ्याच लेखकांना त्यांची प्रेरणा दिली होती, लेखनाचा सत्य घटना मांडणी मध्ये देखील वापर होऊ शकतो हे जगाला पटवून दिले होते. मंटों अर्थीक दृष्टीतने सबळ नव्हते, फाळणीच्या मरणप्राय यातना भोगल्या होत्या, अनेक वेळेस लेखनामुळे निंदाचे पात्र ठरले होते या सगळ्यामुळे त्यांनीं दारू सेवनाची सुरुवात केली. ते डिप्रेशन मध्ये गेले होते. दारूसेवनाच्या अतिप्रमाणामुळे यकृताच्या विकाराने (liver cyrosis) मंटोंचा १८ जानेवारी १९५५ मध्ये मृत्यू झाला.