शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे

पूजा मोरे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचा प्रश्न अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलांमुळे सुटला आहे. स्वाभिमानीच्या पूजा मोरे यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी करून दाखविले आहे. यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचे अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ साखर कारखाना, आणि धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्याच्या संचालक मंडळींनी या शेतकऱ्यांना वेठीस धरले होते. वारंवार हेलपाटे घालूनही शेतकऱ्यांना आपल्या उसाचे बिल नसल्याने शेतकरी हैराण झाले होते.

थोड्याच दिवसांमध्ये या वर्षीचा हंगाम सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली होती. मात्र, नवीन हंगाम सुरु होण्याअगोदरच स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना आपल्या काष्टाचे पैसे खात्यात जमा झाले आणि शेतकऱ्यांच्या सात महिन्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.

विशेष म्हणजे, घटस्थानेदिवशी खात्यात लक्ष्मी अवतरली असल्याने शेतकरी व वाहतूक तोडणी ठेकेदार सुखावले आहेत.

या लढ्याबद्दल पूजा मोरे सांगतात, एकीकडे बीडला दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखले जात असले, तरी केज, माजलगाव आणि गेवराई या तालुक्यात शेतीसाठी पुष्कळ पाणी उपलब्द्ध असून ऊस उत्पादनावर येथील शेतकऱ्यांचा मोठा भर आहे.

मात्र, कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईला आलेल्या कारखाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. स्थानिक कारखानदार राजकारणात सक्रीय असून शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात नेताना मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जाते.

बीड मधील कारखानदारांकडून देखील उसाचे बील थकीत ठेवले जाते. त्यातच अक्कलकोट आणि तुळजापूरच्या कारखानदारांनीही आमच्या शेतकर्याचे बिल थकवल्याने मला पुढाकार घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला.

ग्रामीण भागातील एखादा शेतकरी आपल्या तालुक्यात जाऊन देखील कारखानदारांना सवाल करू शकत नाही. पण आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन हक्काचे पैसे मिळविले, असेही मोरे यांनी सांगितले.

अधिक वाचा :

RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…

अटलजी पंतप्रधान होताच गोपीनाथराव साखर कारखानदार झाले…


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *