विद्यार्थ्यांच्या मागणीला यश; MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली
मुंबई: राज्यात ११ एप्रिल रोजी होणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आणि अधिकारी यांच्या झूम द्वारे ही बैठक झाली. त्यात परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच काही वेळा पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करू परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. त्याच बरोबर राज्य सरकार मधील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आदी मंत्र्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलविली आहे. त्यात अजित पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसेवा आयोगाची ११ एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, अनेक विद्यर्थ्याना कोरोना झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत आहे. ३० एप्रिल पर्यंत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर शनिवार, रविवारी राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. यामुळे ११ एप्रिल रोजी परीक्षा कशी होणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच MPSC समन्वय समितीच्या वतीने सुद्धा १ महिना परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली आहे. MPSC समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयोगाचे सचिव यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे करण्यता आलेल्या मागणीला यश आले आहे.