गडकरींच्या पाठपुराव्याला यश; विदर्भाला मिळणार दिवसाला रेमडेसिविरच्या ३० हजार वायल
नागपूर: राज्यात कोरोनाची विक्रमी रुग्ण वाढ होत असताना रेमडेसिविर इंजेक्शनचां तुटवडा जाणवत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. अशा वेळी एक चांगली बातमी आली असून वर्ध्यातील जेनेटेक लाईफ सायन्सेस ला दिवसाला 30 हजार कुपी (वायल) बनविनायचा परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. गडकरी यांच्या पाठपुराव्या नंतर केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
रेमडेसिविर तयार करणाऱ्या गीलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन बनविण्याची परवानगी दिली होती त्यातील एक कंपनी लोन लायलंस द्वारे जेनेटेक लाईफ सायन्सेस रेमडेसिविर इंजेक्शन तयार करेल. साधारण एक आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिविर उत्पादनं सुरू करेल. 15 दिवसात 30 हजार वायल प्रतिदिन विदर्भातील सर्व जिल्ह्यात मिळेल.
यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे. सध्या राज्यात सर्व ठिकाणी रेमडेसिविरचां तुटवडा जाणवत आहेत.