राज्यात आज पासून कडक निर्बंध; जाणून घ्या नियम

The option of 'complete lockdown' is now before the administration, the 'Ya' Collector indicated
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. यामुळे राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत आज रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंधांचे आदेश लागू करण्यात आले आहे. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे नियम राहणार आहेत. बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे.
काय आहेत नवीन नियम
-सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयामध्ये 50 टक्के उपस्थिती राहणार. मात्र, आवश्यकतेनुसार 100 टक्के उपस्थिती वाढवता येणार.

  • लग्नसमारंभात केवळ 25 लोकांना उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉल मध्ये 2 तासाच्या आत लग्न उरकावे लागणार. नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड आकारण्यात येणार आहे.
  • खासगी वाहतुकीसाठी चालकासह 50 टक्के क्षमतेने प्रवाशांना परवानगी. नियमांच उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
  • लोकल ट्रेन मध्ये केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असणार आहे. उभे राहून केवळ 50 जण प्रवास करू शकतात.
  • खासगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठीच.
  • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा असणार आहे.
  • किराणा, भाजीपाला दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार आहे.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *