राजधानी दिल्लीत आज रात्रीपासून कडक संचारबंदी

दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रानंतर आता भारताची राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाने थैमान घातला आहे. दिल्ली सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेदिवस नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडक संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल तशी त्यांनी घोषणा ही केली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती दिसणार आहे. दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सोमवार सकाळपर्यंत संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत बैठक
या बैठकीत सोमवारी दिल्लीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बिजल यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढाव घेत दिल्लीत संचारबंदीचा निर्णय घेतला. आज रात्रीपासून सक्तीने ही संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, नागरिकांना २६ एप्रिलपर्यंत घरातच राहावे लागणार आहे. दिल्लीत यापूर्वी विकेन्ड संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. शहरात केवळ १०० हून कमी आयसीयू बेड शिल्लक असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, केंद्र सरकारच्या रुग्णालयांतील ७ हजार ००० बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करत केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.
या गोष्टींवर असणार बंदी
रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी बेडस उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होऊ शकलेलं नाही. यामुळे दिल्ली सरकारने एका कंट्रोल रुमचीही स्थापना केली आहे. हा कंट्रोल रुम ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याच्या डाटावर नियंत्रण ठेवणार आहे. दिल्लीतील पूर्ण संचारबंदी दरम्यान मॉल, स्पा, जिम, सभागृह पूर्णपणे बंद राहतील. तथापि सिनेमा हॉल ३० टक्के क्षमतेसह चालू शकतील. यासह, प्रत्येक झोनमध्ये एका दिवसात फक्त एका साप्ताहिक बाजारास परवानगी असेल. शनिवार आणि रविवारच्या कर्फ्यू दरम्यानही अशीच व्यवस्था केली होती.