कुंभमेळ्यात नियमांचं उल्लंघन करत तुफान गर्दी, अब सब भगवान भरोसे!

हरिद्वार: जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.
अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं सरकारने अनिवार्य केलं असल्याने कोरोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला. हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरूच आहे. हरिद्वार महाकुंभात आज दुसरं शाही स्नान पार पडतंय. या शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यांतील साधू-संत सहभागी झाले आहेत.
हजारोंच्या संख्येनं मोठ्या भक्तीभावानं स्नानासाठी इथं गर्दी जमलीय. मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाल्यानं अनेक ठिकाणी कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होतंय. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या पालनांचा कुठेही समावेश नाही. अनेक जण मास्कशिवाय पाण्यात स्नानासाठी दाखल होत आहेत.
कुंभमेळ्याचे महानिरीक्षक संजय गुंज्याल यांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा यंत्रणेकडून वारंवार लोकांना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातंय. परंतु, मोठ्या संख्येनं जमा झालेल्या गर्दीमुळे दंड वसूल करणं व्यवहारिकरित्या शक्य नाही. सोबतच, एवढ्या मोठ्या गर्दीकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करवून घेणं शक्य नाही, सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर पळापळी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी अडचणही त्यांनी व्यक्त केलीय.
हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांच ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४ एप्रिलला शहरात १७३ रुग्ण आढलले होते तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ८३७ होती. त्यामुळे इतर ठिकाणचं काहीही असलं तरी हरिद्वारमधला कोरोना भगवान भरोसे असल्याचं पहायला मिळतंय.
Uttarakhand: Sadhus participate in the second ‘shahi snan’ of Maha Kumbh at Har Ki Pauri ghat in Haridwar pic.twitter.com/VMjd4h5Gcp
— ANI (@ANI) April 12, 2021