|

अफवांची धुळवड थांबवा; पवार-शहा भेट झालीच नाही- संजय राऊत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुप्त भेटीवरून तर्कवितर्क लावण्यात येत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून पवार-शहा यांची भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा हाती काहीच लागणार नाही अस म्हटल आहे.

            शरद पवार-अमित शहाच्या गुप्त भेट झाली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. “मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त बैठक झाली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही” अस राऊत यांनी म्हटलं आहे.

            मात्र, अर्ध्या तासापूर्वी शरद पवार-अमित शहा यांची भेट झाली तर होऊ दे. असेही बंद खोलीत चर्चा झाली तर मुद्दे बाहेर येतात. कामानिम्मित दोन नेत्यांची भेट झाली तर होऊ द्या. अस राऊत यांनी म्हटले होते. मात्र, अर्ध्या तासात आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पवार-शहा भेट झालीच नाही असा दावा संजय राऊत यांनी ट्वीट करून केला आहे.

तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पवार-शहा भेट झाल्याचे नाकारले आहे. पवार-शहा यांची भेट झाली नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे त्यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *