निर्लज्ज राजकारण थांबवा आणि राज्याची जबाबदारी घ्या; पियूष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर परखड टीका

दिल्ली : आज सकाळपासून ऑक्सिजन पुरवठ्या वरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक ठिकाणावरून येत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याच्या मागणी केली होती.
याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करून देशभरात महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनचां पुरवठा होत असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले पियूष गोयल
देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला होत आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या संपर्कात आहे. राज्याला लागेल ती मदत करत असल्याचा दावा पियूष गोयल यांनी ट्विट करून केला आहे.
राजकारण पाहून दुःख होतय
कालच पंतप्रधान यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने या संकट काळात एकत्रपणे काम करायचे आवाहन केले होते. पण हे सगळे असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेले राजकारण पाहून दुःख होत आहे. त्यांनी निर्लज्ज राजकारण थांबवायला पाहिजे आणि जबाबदारी घ्यायला पाहिजे. अस देखील गोयल यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
आता वेळ आली आहे
महाराष्ट्रात सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातले नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारी याच योग्य पद्धतीने पालन करत आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कर्तृत्व पाळून माझ राज्य माझी जबाबदारी ते तत्त्व पाळले पाहिजे. अश्या शब्दात राज्य सरकारवर टीका केली आहे.