रेमडेसिविरचां साठा करणे मानवतेच्या विरोधात; प्रियंका गांधी यांची फडणवीसांवर टीका

मुंबई : ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीला बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी – विरोधांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. यावरून वादाला तोंड फुटले आहे.
यात आता काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी उडी घेतली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रेमडेसिविर एखादे वायल मिळविण्यासाठी नागरिक प्रयत्न करत असताना भाजप मधील जिम्मेदार नेते साठा करत असून हे मानवता विरोधात असल्याची टीका केली आहे. याबाबत काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणल्या प्रियंका गांधी
देशातील कानाकोपऱ्यात रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याबाबत नागरिक मदत मागत आहेत. जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविरचे एखादे वायल मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप मधील जिम्मेदार नेत्याचे रेमडेसिविर साठा करणे हे मानवतेच्या दृष्टिकोनातून अपराध असल्याची टीका ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
तसेच काँग्रस नेते दिग्विजय सिंह यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. रेमडेसिविर घेण्यासाठी ४.५ कोटी कुठनं आले याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली