राज्यभर रात्रीची संचारबंदी
मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन गाईडलाईन काढली आहे. त्यानुसार आज रात्री पासून ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, सिनेमागृह, उद्याने यांच्यावर सुद्धा बंधने आणली आहे. तर सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध १५ एप्रिल पर्यंत लागू राहणार आहेत.
राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी नवीन गाईडलाईन काढल्या आहेत. सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर १ हजार दंड लावण्यात येणार आहे.
संचारबंदीचे नवीन नियम
- रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक नागरिकांना जमण्यास बंदी
- यावेळेत चौपाटी. उद्याने, सिनेमागृहे बंद राहणार
- मास्कशिवाय फिरणाऱ्या ५०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड
- सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
- अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना परवानगी
- लग्नकार्यात ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही