लसीकरण मोहिमेला येणार वेग; रशियाच्या स्पुटनिक V या लसीला भारतात परवानगी

मुंबई: कोरोना बाधित वाढत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मध्ये लसीच्या पुरवठ्या वरून वाद सुरु आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वांना लस द्या अशी मागणी केली आहे. भारतात सध्या कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या लसी उपलब्ध आहेत. आता भारतीय औषध नियामांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापरला मंजुरी दिली आहे.
कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी भारतीय बनवाटीच्या आहेत. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरिज ही स्पुटनिक V लस बनवणार आणि विक्री करणार आहे. नागरिकांना या पण लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. लस घेतल्यानंतर २८ आणि ४२ दिवसांनी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागणार आहे.
Subject Expert Committee approves Dr Reddy’s application for emergency use authorisation to Sputnik V: Sources#COVID19 pic.twitter.com/U2wsCQTNY0
— ANI (@ANI) April 12, 2021
डॉ. रेड्डीज लेबोरेटरिज ही स्पुटनिक V लस बनविण्यासाठी रशिया डायरेक्ट इन्वेसमेंट फंड यांच्यासोबत करार केला आहे. भारतात कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड देण्यात येत आहे. आता या दोन्ही बरोबर स्पुटनिक V लसीला मान्यता दिल्याने लसीकरनाच्या मोहिमेला वेग येणार आहे.
स्पुटनिक V घेतल्यानंतर २ महिने दारू न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रशिया सरकारने आपल्या नगरीकांना हा सल्ला दिला आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यात येत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून दोन महिने दारू पिवू नये असा सल्ला दिला आहे.