सोनू सूद कोरोनाबाधित

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आलिया भट्ट, आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह,अक्षय कुमार,गोविंदा,कार्तिक आर्यन,विकी कौशल,कतरिना कैफ यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलंय.
१० ऑक्सिजन जनरेटरची मदत –
संपूर्ण देशभरात कोरोनाची स्थिती फारच गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात तर दिवसा ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला रुग्णालयात जागाच नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. औषधे आणि रुग्णालयातील यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रुग्णांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर येथे त्याने रुग्णालयांना मदत केली आहे. इंदौरमध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही असं समजताच अभिनेता सोनू सूदकडून दहा ऑक्सिजन जनरेटर इंदौरला पाठवण्यात आले आहेत.