सोनिया गांधी यांचे केंद्र सरकारला पत्र; लसीकरणबाबत केली ‘मोठी मागणी’

दिल्ली : देशातील कोरोना बाधित झपाट्याने वाढत आहे. लसीकरण वेगाने करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ञ् बोलून दाखवत आहते. मात्र देशात अनेक ठिकाणी लसी अभावी लसीकरण केंद्र बंद पडत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच कोरोना लसीसाठी वयोमर्यादा २५ वर्ष करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच अस्थमा, मधुमेह, आणि इतर आजारी ग्रस्त तरुणांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
सोनिया गांधी आज काँग्रेसच्या कार्यकारणीत बोलत होत्या. सरकारने कोरोनाचा सामना करतांना आरोग्य उपकरणे आणि औषध वरील जीएसटी आकारणे रद्द केले पाहिजे. कोरोना काळात कडक निर्बंध लावल्यास गरीब नागरिकांना प्रतिमाह ६ हजार रुपये देणे आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुले हजारो लोक मरत आहेत. यावर सोनिया गांधी यांनी दुःख व्यक्त केलं. संकट काळात आपलं कर्तव्य बजाविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काँग्रेस पक्ष सलाम करतो असंही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी लसी, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. तरीही केंद्र सरकार गप्प का आहे असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
केंद्र सरकारने लसीकरणाच्या वयोमर्यादेवर फेरविचार करावा आणि ती २५ वर्षापर्यंत खाली आणावी अस्थमा, मधुमेह, आणि इतर आजारी ग्रस्त तरुणांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. आता लसीकरणाची वयोमर्यादा ४५ वर्ष आहे.