अनिल देशमुख यांच्या कार्यकाळातील काही वादग्रस्त गोष्टी

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: अनिल देशमुख यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकीर्दीत काही गोष्टी वादग्रस्त ठरल्या. त्या वादग्रस्त गोष्टीचे लंगड समर्थन करतांना सुद्धा पाहायला मिळाले. अनेक वेळा अनिल देशमुख यांचा पिंड हा गृहमंत्र्याचा नव्हता अशीही दबक्या आवाजात चर्चा ऐकायला यायची. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख असल्याने त्यांना महत्वाचे असणारे गृहमंत्री पद मिळाले होते.

वाधवान बंधूना लॉकडाऊन मध्ये प्रवासाची परवानगी

पीएमसी घोटाळ्यात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले एचडीआयएल आणि डीएचएफएल कंपनीचे मालक असलेले वाधवान कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यांच्याकडे मंत्रालयाचे पत्र आढळून आले होते. त्यांच्याकडे गृहमंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र आढळून आले होते. या पत्रामुळे खळबळ उडाली होती. हे पत्र आपल्या माघारी देण्यात आल्याचे त्यांनी खुलासा केला होता.

राहुल कुलकर्णी यांना अटक

एबीपी माझाचे उस्मानाबाद येथील विशेष प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना चुकीची माहिती पसरविल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. राहुल कुलकर्णी यांनी लॉकडाऊन मध्ये मजुरांसाठी विशेष रेल्वे सुरु होणार असल्याचे वृत्त प्रसारित केल होते. त्यानंतर मुंबईत काही ठिकाणी रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. खोटे वृत्त प्रसारित केल्याचे सांगून राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका झाली होती.

विरोधी पक्षनेत्याकडे CDR

मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आल्याप्रकरणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोन मोठे गौप्यस्फोट केले होते. त्यात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वाहन मालक मनसुख हिरेन यांचा CDR सभागृहात सादर केला होता. तसेच मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेले जबाब.

परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप त्यांनी केला होता. या दोन गोष्टीवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर वाचक नसल्याचे बोलण्यात येत होते. तसेच त्यांना माहिती देण्यापूर्वी ती माहिती विरोधी पक्ष नेत्याकडे कशी जाते अशी टीका त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात येत होती.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *