सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा.

Why no FIR was registered against Amit Shah? The High Court slapped the police
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली: छत्तीगसढमधल्या बीजापूर – सुकमा जिल्ह्याच्या सीमेनजिक जोनागुडा गावाजवळ काल नक्षलवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. गेल्या चार वर्षांत नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला ठरलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४०० नक्षलवादी टेकलगुडा गावाच्या डोंगरांवर आणि आजूबाजूला उपस्थित होते. एका विशेष मोहिमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांच्या पथकाला या नक्षलवाद्यांनी घेरलं आणि त्यांच्यावर बंदुकांनी गोळ्यांच्या फैरीच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले तर ३१ जण जखमी झाले. या घटनेनंतर केंद्रीय पातळीवर गृहमंत्रालयांच्या बैठकांचं सत्र सुरु झालंय. सरकार आता नक्षलवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगढच्या जगदलपूर इथं जाऊन आज शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिलाय. ‘नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना मी सरकार आणि समस्त देशवासियांकडून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आज आम्ही याबाबत एक बैठक घेतली. मी देशाला विश्वास देतो की ही लढाई थांबरणार नाही, तर अधिक वेगाने पुढे जाईल. शेवटी नक्षलवादाविरोधात आमचा विजय निश्चित आहे’, असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

सैन्याचं मनोबल कायम-अमित शाह
गेल्या काही वर्षात नक्षलवादाविरोधात लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. या दूर्भाग्यपूर्ण घटनेनं ही लढाई आता अजून दोन पावलं पुढे नेली आहे, असंही अमित शाह म्हणाले. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एक समिक्षा बैठक झाल्याचंही शाहांनी साांगितलं. यावेळी ही लढाई अधिक तीव्र करण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आमच्या सैन्याचं मनोबल कायम असल्याचंच यातून दिसून आल्याचं शाह म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *