…तर मग लसीकरण सुरुच का केले? महापौर मुरलीधर मोहोळ, पुणेकरांना केले ‘हे’ आवाहन

पुणे : शहरात कोरोनाची स्थिती दिवसागणीत बिघडत जात असताना लसीचा साठा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने शहरातील लसीकरण थांबले आहे. दरम्यान 1 मे म्हणजे आजपासून देशासह राज्यात १८ ते ४४ वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लस नसल्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ उडालेला बघालया मिळाला आहे. यावेळी पुण्याचे महोपौर यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. शहरात आठवड्यासाठी फक्त ५००० लसी देण्यात आल्या असून या लसी कशा पुरवायच्या. जर ही परिस्थिती असणार होती तर लसीकरण सुरुच का केलं गेलं असा प्रश्न पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, दोन केंद्रावर दिवसाकाठी ७०० लसी वापरल्या जातील असं लक्षात आल्याने आम्ही नागरिकांनी गर्दी करु नये असं जाहीर केलं होतं. तरीदेखिल अनेक नागरिकांनी गर्दी केली. सरकार कडुन १८-४४ वयोगटासाठी फक्त ५००० लसी पुरवल्या गेल्या आहेत. या लसी ७?दिवस पुरवायला सांगितल्या आहेत. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात हे लसीकरण होणार आहे. नागरिकांनी नोंदणी केली नसेल तर गर्दी करु नये अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत.
१८ ते ४४ वय असणाऱ्या नागरिकांना आज लसीकरण सुरु केल्यामुळे शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर पुणेकरांनी गर्दी केली आहे. तसेच यामध्ये नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या नागिकांचा सुद्धा समावेश दिसून आला आहे. अशी परिस्थिती असताना लसीचा तोडका पुरवठा. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठा गोधंळ उडालेला दिसून आला आहे.