…म्हणून कंगणाचे ट्विव-ट्विव कायमचे बंद

... so the kangana twive-twive off forever
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वृत्तसंस्था : काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कंगना रणौत तिच्या ट्विट्समधून सातत्याने तिरस्कार पसरवण्याचं काम करत असते त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं असं या याचिकेत म्हटलं आहे. देशातील एकोपा, बंधुभाव बिघडेल, वातावरण गढूळ होईल असे तिचे ट्विट्स असतात. एवढंच नाही तर तिने न्याय व्यवस्थेचीही अनेकदा खिल्ली उडवली आहे त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणीही अनेकदा केली जात होती. अखेर आज ट्विटर कडून कंगणाचे अधिकृत व्टिटर खाते बंद करण्यात आले आहे.

पुन्हा एकदा अशीच मागणी करण्यात आली असून अखेर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर तिचे अकाऊंट हे सस्पेंड करण्यात आलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *