|

म्हणून भाजपला केरळमधील लोक मतदान करत नाहीत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आमदार ओ. राजगोपाल यांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल

कोची: केरळच्या १६० जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. अशातच केरळ भाजपचे नेते आणि राज्यातले पक्षाचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजगोपाल यांनी हे विधान केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं आमदार ओ. राजगोपाल यांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे. केरळमध्ये शिकलेले लोक अधिक आहेत. हे शिकलेले लोक भाजपला मतदान करत नाहीत, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलंय. आमदार ओ राजगोपाल म्हणाले की, “केरळ हे राज्य इतर राज्यांहून वेगळं आहे. या राज्यात भाजपची वाढ होत नाही त्यामागे दोन-तीन गोष्टी आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या राज्यातील साक्षरता दर हा ९० टक्के इतका आहे. लोक उच्चशिक्षित असल्याने त्यांना वाटतं की ते कोणत्याही प्रश्नावर वाद-विवाद करू शकतात, उच्चशिक्षित लोकांची ही सवयच आहे.”

आमदार ओ. राजगोपाल पुढे म्हणाले की, “दुसरा मुद्दा म्हणजे या राज्यात हिंदूंचे प्रमाण हे ५५ टक्के इतके आहे तर अल्पसंख्यांकांचे प्रमाण हे ४५ टक्के आहे. त्यामुळे भाजपची राजकीय गणिते जुळत नाहीत. याच कारणामुळे केरळची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही. या राज्यातील परिस्थिती वेगळी आहे आणि आम्ही हळू का असेना पण सातत्याने प्रयत्न करत आहोत.”

 केरळमध्ये भाजप पक्षाची वाढ का होत नाही यावर केरळ भाजपचे नेते आणि राज्यातले पक्षाचे एकमेव आमदार यांनी दिलेलं हे उत्तर सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *