म्हणून परमबीर सिंह यांना बाजूला काढलं – अनिल देशमुख

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी यांचे नाव आल्यानंतर सरकारच्या अडचणीत वाढ होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतरच पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे बोलण्यात येत होते. दरम्यान सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आणि चर्चांना उधाण आले.

लोकमतच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने गृहमंत्री अनिल देशमुख यांना गौरवण्यात आलं. यावेळी गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच सचिन वाझे प्रकरण, मुंबई पोलीस आयुक्त बदली प्रकरणावर भाष्य केलं.अनिल देशमुख म्हणाले की, “एनआयए आणि एटीएसमार्फत तपास सुरु आहे त्यांच्या माध्यमातून ही बाब समोर आली. मुंबई पोलीस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत अक्षम्य चुका झाल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. म्हणून बदलीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची जगात ख्याती आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी चुका केल्या, तपासात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. स्फोटकांचा मुद्दा येतो तिथे एनआयए तपास करतेच. या प्रकरणात जो कोणी दोषी असतील त्यांना तपास यंत्रणा शोधून काढतीलच. एनआयए आणि एटीएस प्रोफेशनल एजन्सी आहे. त्या दोषींना शोधून काढणारच.

“मुंबई पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन नाही. चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की, चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी त्यांना बाजूला केलं,” असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं. विरोधी पक्ष इथून तिथून माहिती घेतं. गृहखातं तीन पक्ष चालवतात असं म्हटलं जातं. त्याबाबत सांगतो की अनिल देशमुख गृहमंत्री आहेत. बदल्यांचा विषय येतो तो निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुनच होतो, असंही ते म्हणाले. दरम्यान सचिन वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जागी आता हेमंत नागराळे नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नागराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे.  सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, डॉ. व्यंकटेशम यांची नवे सुद्धा चर्चेत हो


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *