|

म्हणून केरळ, पुदूचेरी रिपाइंने उमेदवार उभे केले नाही; रामदास आठवले यांचा खुलासा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : सध्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी या ५ राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. पाचही राज्यातील राजकारण तापू लागले आहे. यातील पश्चिम बंगाल मध्ये पहिल्या टप्प्यात ३० मतदारसंघात मतदान झाले आहे. केरळमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळ आणि पुदूचेरी मध्ये रिपाइंने उमेदवार उभे केले नाही. त्या बाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करून खुलासा केला आहे.

            ट्वीट मध्ये रामदास आठवले यांनी सांगितले की, “केरळ आणि पुदूचेरी या दोन्ही राज्यात भाजप ला विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.त्यामुळे रिपाइंने उमेदवार उभे केले नसून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आरपीआय चे कार्यकर्ते काम करीत आहेत.

केरळमध्ये एलडीएफ ;काँग्रेस प्रणित युडीएफ यांनी कोणताही विकास केला नाही. त्यामुळे यंदा निवडणुकीत केरळच्या विकासासाठी ; रोजगार निर्मितीसाठी भाजप प्रणित एनडीए ला केरळची जनता विजयी करील” असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

केरळ मध्ये भाजपकडून मेट्रो मॅन  ई- श्रीधरन यांची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *