Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचा…म्हणून IPS रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार

…म्हणून IPS रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप असून बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आज त्यांची चौकशी होणार होती. यासाठी आज २८ एप्रिल सकाळी ११ वाजता आयपीएस रश्मी शुक्ला यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र या चौकशीसाठी त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण पुढे केले आहे.

आयपीएस रश्मी शुक्ला यांनी काल रात्री उशिरा पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, वरिष्ठ अधिकारी केंद्रिय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप यांना एक ई मेल पाठविला आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईसह हैद्राबाद मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या कारणामुळे प्रवास करता येणार नाही. व आपल्याकडील अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता आपल्याला प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही असा ई मेल त्यांनी केला आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. दरम्यान मुंबई पोलिस यावर आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण?
आयपीएस रश्मी शुक्ला ह्या एसआयपी मध्ये कार्यरत असताना त्यांनी काही मंत्र्याचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विभानसभा निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले असल्याचा एसआयपीमध्ये कार्यरत असताना रश्मी शु्क्ला यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. तसेच भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदारांना फोन करुन धमकावणे असे सुद्धा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments