Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाखासदार मोहन डेलकर आत्महत्येची SIT चौकशी होणार

खासदार मोहन डेलकर आत्महत्येची SIT चौकशी होणार

मुंबई: दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम (SIT) करणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधीमंडळात ही घोषणा केली. मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या आत्महत्या संबंधित चौकशी करा, अशी मागणी केली होती. या मुद्द्याला धरून उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटी कडे सोपवण्यात आली आहे, असे सांगितले.

विधानसभेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, “मोहन डेलकर हे सात वेळा दादरा नगर हवेलीचे खासदार होते. आणि सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो, ते हि मुंबईत येऊन. तसेच सूसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. या घटनेत प्रशासक प्रफुल्ल पटेल याचं नाव देखील घेतल्या जात आहे. प्रफुल्ल खेडा पटेल हे दादरा नगर हवेलीचे प्रशासक आहेत ते पूर्वी भाजप सरकारच्या काळात गुजरातचे गृहमंत्री होते. त्यानंतर त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. प्रफुल्ल खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास देण्यात येत होता. त्यांना सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या, असं सुसाईड नोट मध्ये नमूद आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. प्रफुल्ल खेडा पटेल हे दादरा नगर हवेलीचे प्रशासक आहेत.

एसआयटी म्हणजे काय?

एसआयटी म्हणजे स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम. हे सहसा सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन केले जाते. यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश आणि काही तज्ञ ठेवले जातात. हि एक विशेष तपासणी एजन्सी मानली जाते, जी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता हाय प्रोफइल प्रकरणात किंवा लोकांविरुद्ध तपास करू शकते. गेल्या काही वर्षात सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणामध्ये एसआयटीचा हस्तक्षेप दर्शवला आहे.

डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अस म्हटल आहे कि, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, मला तिकडे त्रास असला तरीही मी इकडे येऊन आत्महत्या करतोय. उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल, असेही नोट मध्ये लिहले होते. दरम्यान, मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने विधीमंडळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेची मागणी केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी २४ फेब्रुवारीला मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे असलेल्या सी-ग्रीन साउथ हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments