पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा

पुणे : शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गंभीर रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. कोरोनाचे सावट अधिक गडद झाल्यानंतर पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा असे मजकूर असलेले बॅनर पुण्यातील स्मशान भूमीत लावण्यात आले आहे.
पुणे शहरात दररोज ६ हजार पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून येते आहे. व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याची तक्रार नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. आता अनेकजण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत अशी विचारणा करत आहेत.
पुण्यातील स्मशान भूमीत एक बॅनर लावण्यात आले असून त्यावर ‘मरण झाले स्वस्त… अंत्यविधीसाठी लागल्या रांगा. “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा” – कोरोनाग्रस्त पुणेकर’ अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची चर्चा समाज माध्यमावर होत आहे.
पुण्यात काल दिवसभरात ६ हजार ४४३ पाझिटिव्ह रुग्णांची आढळून आले तर ४ हजार ७१२ रुग्णांना उपचारा नंतर सोडून देण्यात आले. करोनाबाधीत ७३ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील होते. सद्या १ हजार २५० क्रिटिकल रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात आता पर्यंत ६ हजर १०९ जणांचे प्राण कोरोना मुळे गेले आहेत.