…त्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

१९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवण्यात आली होती. आज ३५ वर्षांमध्ये आत्महत्यांचे हे सत्र कमी झालेले नाही उलट वाढत गेलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणचे शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह विष घेऊन आजच्याच दिवशी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हटले जाते. ते साल होतं १९८६. त्या दिवशी साहेबराव कर्पे, पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला जाऊन परत आले आणि रात्री स्वयंपाक बनवला आणि त्यात विष कालवले सर्वांनी मिळून जेवण आटोपलं आणि मृत्यूला कवटाळले. शेतकरी साहेबरावांची सहकुटुंब आत्महत्या ही फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातली पहिली सामुहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते.

त्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे लाखो कुटुंब देशोधडीला लागलीत. अलिकडे तर लग्नाच्या हुंड्यापायी, शिक्षणाच्या खर्चापायी शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा आत्महत्या करत आहेत हे अजूनच चिंताजनक चित्र निर्माण होत आहे. पक्ष कुठलाही असो, सरकार कुणाचेही असो. पण शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत हे महाराष्ट्राचं जळजळीत वास्तव. शेतकऱ्यांचा नेता म्हणवणाऱ्या प्रत्येक राजकारणी नेत्याने हे कटू सत्य स्वीकारावं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सर्व शेतकरीविरोधी सरकारी धोरणाचा परिणाम आहे.

साहेबराव कर्पे यांच्याकडे ४० एकर जमीन होती. गावात त्यांचा मोठा वाडा होता. गावचे ते ११ वर्षे सरपंच होते. पंधरा एकरावर गहू आणि चणा होता. भजन किर्तन करणाऱ्या साहेबरावांनी कुटुंबासह आत्महत्या केली. मग एवढी जमीन असतांना साहेबरावांनी आत्महत्या का केली असणार? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार. अनेकांचा असा समज असतो की, ज्याच्याकडे जमीन जास्त असते तो श्रीमंत व संपन्न शेतकरी. पण तो समज साफ खोटा असल्याचं मुख्य उदाहरण म्हणजे साहेबराव! सरकारला शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या दारिद्र्याच्या जीवघेण्या झळा समजाव्यात, या उद्देशा पोटी साहेबराव यांनी आपल्या अख्ख्या कुटुंबासहित केलेल्या आत्महत्येने काही फारसा फरक पडलाय का? तर नाही हेच उत्तर आहे. गेल्या ३५ वर्षात अशी अनेक कुटुंब कायमची संपलीत. हे सर्व सरकारी धोरणांच्या हत्या असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना, नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. परंतु या निगरगट्ट झालेल्या व्यवस्थेला कितीही शेतकरी का मरेना त्याचा फरक पडत नाही.

कर्पे कुटुंबांनी का आत्महत्या केली असावी? तर याच निर्दयी व्यवस्थेमुळे अख्खं कुटुंबाने स्वतःला संपवलं. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गाव चिलगव्हाण. आजूबाजूच्या गावात देखील साहेबरावांच्या भजनं नावाजलेले होते. गावचे सरपंच आणि स्वभावाने असलेला अगदी सज्जन माणूस शेती करत आपल्या कुटुंबासहित गुण्यागोविंदाने राहत होते. शेतकरी म्हटलं तर कधी या वर्षी पीक तर दुसऱ्या वर्षी नापिकी असते. त्यामुळे त्यांची वीज बिल थकलेले होते. त्यामुळे संबंधित कंपनीने वीज कनेक्शन तोडून टाकलं. परिणामी साहेब राव यांनी सुमारे ४५ एकरात लावलेला गहू आणि हरभरा पोटऱ्यापर्यंत आलेला होता. विज नाही त्याच्यामुळे पिकाला पाणी नाही. त्यामुळे पीक जळून गेलं. पिकासाठी घेतलेल्या कर्जाची चिंता साहेबरावांना आतल्याआत खाऊ लागली. अस्वस्थ हताश आणि हतबल झालेल्या शेतकऱ्याने करावं तरी काय? त्यांनी शेवटी मनाशी निश्चय पक्का केला.

आणि नेहमीप्रमाणे वर्ध्यातील मनोहर कुष्ठधामात आले. तिथे एक खोली घेतली आणि हार्मोनियम आणि टाळ घेऊन आपल्या मुलांसोबत भजन करत बसले. त्यांच्या पत्नीने तोवर भजी तळली. साहेबराव दुनिया भजन मध्ये विषारी औषध मिसळले होते. भजे साहेबराव आणि मुलांना खाऊ घातले त्यानंतर एक-एक करत चारही मुले तडफडत मरून गेले. त्यापाठोपाठ मालती कर्पे यांनीदेखील जगाचा निरोप घेतला. सर्वात शेवटी ही भजी खायच्या आधी साहेबराव आणि एक चिठ्ठी लिहिली. त्यात चिट्ठीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी लिहिले. त्यांनी आत्महत्येचा पर्याय का निवडला याबद्दलही सविस्तर लिहिलं. आणि ह्या चिट्टीला दाराबाहेर फेकून स्वतःही त्यांनी विषयुक्त भजी खाऊन जगाचा निरोप घेतला. अंगावर शहारे आणणाऱ्या ह्याच घटनेप्रमाणे अशाच घटना आतापर्यंत पाच लाखांच्या वर घडलेल्या आहेत. दरवेळेस कारणं वेगळी-वेगळी असतील पण त्याचा संबंध हा थेट त्यांच्या शेती व्यवस्थेबद्दल. शेतीच्या धोरणाबद्दल असतो. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही.

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आपण काय करू शकतो? आपण सामान्य नागरिक आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचा आपल्याला अधिकार नाही. करोडो शेतकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवढी आपली आर्थिक कुवत नसते. पण आपण सहवेदना व्यक्त करू शकतो. साहेबराव कर्पे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शेतकाऱ्याना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आपल्याला उपवास पाळला जातो. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न म्हणून २०१७ पासून मरण कवटाळणे भाग पडलेल्या शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशातील लाखो सहृदयी लोक दरवर्षी १९ मार्चला उपवास करतात.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *