‘३५ मिनिटांचं भाषण १७ सेकंदमध्ये दाखवण्यात’ ; सुप्रिया सुळेंची ‘त्या’ प्रकरणावर प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांबाबत केलेल्या एक विधानामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला होता. त्यामुळे भिडे यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.

अशातच खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकारांबाबतच्या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३व्या राष्ट्रीय अधिवेशनात सुळे उपस्थित होत्या. त्यावेळे त्यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं.

‘नियम फक्त आम्हालाच का? न्यूज चॅनल मधील मुली साडी का नेसत नाहीत? असा प्रश्न सुळेंनी विचारला. न्यूज चॅनल मधल्या मुलींनो मराठी भाषा बोलता मग साडीच नेसा’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताच त्यांच्या वक्तव्यांची तुलना भिडेंच्या वक्तव्याशी केली जात आहे.

या विधानामुळे सुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..?
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या’, असं म्हणत आपली सुप्रिया सुळे यांच्या विधानावर गप्प बनणाऱ्यांना आव्हान दिलंय.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्या म्हणाल्या, “माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथं एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले.

मी या भाषणता कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावे, हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे, हे सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे ते भाषण सर्वांनी पूर्ण ऐकावं. माझं ३५ मिनिटांचं जर भाषण १७ सेकंदमध्ये दाखवण्यात येत असेल तर त्यावर काय बोलणार”.

”निंदकाचे घर असावे शेजारी”

त्या म्हणाल्या की, मी संविधानावर विश्वास ठेवणारी नागरिक आहे. त्यामुळे कोणी माझ्यावर टीका करत असेल, तर त्यात चुकीचं काहीही नाही. तो त्याचा अधिकार आहे. माझी आई मला नेहमी सांगते की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे अशा टीकेचं मी स्वागत करते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *