”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय ?

आमिर खान
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट चित्रपट फ्लॉप झाल्यानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान प्रचंड मानसिक तणावात असल्याचं सिनेसृष्टीत बोललं जात होतं.

‘लाल सिंग चड्ढा’च्या अपशयानंतर आमिर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

दरम्यान, आमिरनं एक खुलासा करत आपली आगामी भूमिका मांडली. मागच्या काही दिवसांपूर्वीच मित्रांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमिरनं उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्यानं अभिनयातून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं.

‘जेव्हा मी एका चित्रपटात अभिनेता म्हणून काम करतो, तेव्हा इतर गोष्टींचा मला पूर्णपणे विसर पडतो. ‘लाल सिंग चड्ढा’नंतर मी चॅम्पियन नावाच्या चित्रपटावर काम करणार होतो. ती कथा फारच अप्रतिम आहे, पण मला आता असं वाटतंय की आता काही काळ अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा, माझी आई, परिवार मुलं यांना वेळ द्यायला हवा’, अशी भूमिका आमिरनं मांडली.

आमिर म्हणाला की, मी गेली ३५ वर्षं सलग काम करत आहे. त्यामुळे मी अजूनही पुढे काम करणं हा माझ्या जवळच्या व्यक्तींवर अन्याय होईल, त्यांनाही वेळ देणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. किमान पुढचं एक ते दीड वर्षं तरी मी निदान अभिनेता म्हणून काम करणार नाही.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *