‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचं वयाच्या ८९व्या वर्षी कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात अनेकांचा जीव जाताना दिसून येत आहे. दरम्यान देशाने कोरोनाकाळात अनेक महत्वाच्या व्यक्तींना गमावले आहे. आज अशाच एका मोठ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगाच्या सर्वात जास्त वयस्कर म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रो तोमर यांचा आज वयाच्या ८९व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ‘शूटर दादी’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तोमर यांच्यावर मेरठच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता त्या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
मंगळवार रोजी चंद्रो तोमर यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निर्दशनात आले होते. त्यांनतर त्यांना श्वास घेताना अडचणी यायला सुरुवात झाली. त्यांनतर तातडीने त्यांना मेरठ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाने आज सर्वात वयस्कर नेमबाज गमावला आहे. चंद्रो तोमर यांनी नेमबाजीत विशेष नाव मिळवले होते. ज्यावेळी त्यांनी नेमबाजी सुरु केली तेव्हा त्या अवघ्या ६० वर्षापेक्षा जास्त होत्या. त्यांनी अनेक राष्ट्रिय स्पर्धेत सहभाग घेतला होता.