पुण्यात धक्कादायक प्रकार! १४ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार
पुणे: वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. त्यानंतर अजून दोन मित्र येणार त्यांना तुझ्याबरोबर संबंध ठेवायचे सांगून मुलीवर गोळीबार केल्याचा प्रकारही घडला आहे. यातील एका आरोपीला पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. श्रीकांत काळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी १४ वर्षीय पिडीत मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार १५ दिवसापूर्वी घडला आहे.
१५ दिवसापूर्वी आरोपींनी पिडीत मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील वारजे परिसरात बोलविले होते. यावेळी तिच्यावर बलात्कार केला. अजून दोन मित्रांना तुझ्यावर शारीरिक संबंध ठेवायचा आहे असे सांगितले. पिडीत मुलीने याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळीबार केला. यातील एका आरोपीला पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याची अधिक चौकशी केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहे.