नागपूर लष्करी छावणी परिसरात खळबळ; पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २४ वर्षीय जवानाची आत्महत्या

नागपूर : येथील २४ वर्षीय जवानाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. नवीन राम निवास वय २४ असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून नेमकी त्याने ही आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समजू शकले नाही. या जवानाने ही आत्महत्या नागपूर मधील कामठी येथील लष्करी छावणी परिसरातील शौचालयाच्या खिडकीला शॉल बांधून केली आहे. या जवानाचे पाच महिन्यापुर्वीच लग्न झाले होते त्याच्या आत्महत्येमुळे छावणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसात देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवीन राम हा जवान स्पोर्टस कोट्यातून लष्करात भरती झाला होता. काल सायंकाळी नवीन शौचालयात गेला मात्र तो परतलाच नाही. दरम्यान रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तो ‘गिनती’ ला हजर दिसला नाही. यावेळी नवीन गैरहजर असल्याची नोंद घेण्यात आली. सगळीकडे चौकशी केली असता नवीन येथील शौचालयात लटकलेल्या अवस्थेत दिसता. नवीन पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
जुनी कामठी पोलिसांना जवानाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक एन.ए. मदनकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जुनी कामठी पोलिसात या आत्महत्येप्ररकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करुन घेतली आहे. पुढिल तपास पोलिस करित आहेत.