धक्कादायक! मुलगी व्हॉट्सअॅपवर मुलाशी बोलते या रागातून हत्या करत वडिलांची आत्महत्या

पुणे : स्वतःच्या मुलीच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील मावळ मध्ये घडला आहे. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत आणि ती व्हॉट्सॲपवर त्या मुलाशी बोलते या संशयातून वडिलांनी अख्खं कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यातून लहान मुलगी आणि पत्नी वाचली आहे.
भरत भराटे असे त्या निर्दयी बापाचे नाव आहे. नंदिनी (१८) आणि वैष्णवी (१४) या दोन्ही मुलींची हत्या करण्यात आली आहे. घटनेपूर्वी वडिलांनी चिट्टी लिहून ठेवली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधचां उल्लेख करत पूर्ण कुटुंब संपविणार असल्याचे सांगितले आहे.
भराटे कुटुंबीय हे मूळचे सोलापूर जिल्हातील असून मावळ मधील इंदोरी गावात राहत होते. वडील ट्रक चालवत होते तर आई जवळच काम करायला जात होती. त्यांना तीन मुली असून कोरोनामुळे सध्या शाळेला सुट्टी असल्याने त्या घरीच राहतात. १८ एप्रिल रोजी नंदिनी व्हॉटसअॅपवर कोणाशी तरी बोलत होती. हे तिच्या वडिलांनी पाहिले. तेव्हा भरत यांनी तिला मारहाण केली. आई आल्यानंतर मुलगी वाईट वळणार कशी गेली म्हणत भांडण केले. मध्यरात्रीच्या सुमारास वडिलांनी घरात झोपलेले मुलींना रस्तावर आणून त्यांच्यावर ट्रक नेत स्वतःहा आत्महत्या केली. यातून आई आणि लहान मुलगी वाचली आहे.
तळेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.