वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार?
नागपूर: पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड हे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर आलेले नाहीत. गेल्या १४ दिवसांपासून पूर्णपणे अलिप्त असलेले संजय राठोड हे उद्या मात्र पोहरादेविला येणार असल्याची माहिती देवस्थानांच्या महंतांनी दिली आहे. दरम्यान, समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रीय झालेले आहे. “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” असे नारे देत व्हॉट्सअॅप ग्रुप वर मोहीम राबविण्यात येत आहे.
मात्र वनमंत्री संजय राठोड यांना बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंघ महाराज उद्या राठोड यांना आशीर्वाद द्यायला हजर नसणार आहे. कारण कालच धर्मगुरू हे मूर्तीस्थापनेच्या कार्यक्रमाला गेले असून उद्या हि ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना गुरूंचा आशीर्वाद मिळणार कसा? असा प्रश्न उद्भवलेला आहे.