भाजपला मोठा धक्का
जळगाव महापालिकेत शिवसेनेची बाजी..
पुणे : सांगली महापालिकेत बहुमत असतांना सुद्धा महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. जळगाव मध्ये सुद्धा याची पुनरावृत्ती झाली असून बहुमत असताना सुद्धा भाजपला महापौर, उपमहापौर निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने जळगाव महापलिकेच्या महापौरांची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे सलग दुसरी महापालिका भाजपने गमावली आहे. सध्याच्या घडली शिवसेना ही निवडणूक दिलासा देणारी आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. यात शिवसेनेच्या जयश्री पाटील यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मताने पराभव केला. भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले. महाजन यांना ४५ मते तर कापसे यांना ३० मते पडली आहेत.
महापौर म्हणून शिवसेनेच्या जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली आहे.